माहूर ची chronology (कालपट)
माहूर ची Chronology(कालपट)
ई. स.५८७ - माहूर चा रामगड किल्ला जेमसिंग नावाच्या राजपूत राजाने बांधला.
ई. स.६३४ - महाराष्ट्रची अधिकृत सीमारेषा निश्चित.
ई. स.७५० ते ९७५ - राष्ट्रकूट राजांचा माहुरवर अंमल.
ई. स.९७५ ते ११८९ चालुक्य राजवंशाचा अंमल.
ई. स.११८७ ते १२९४ - देवगिरीच्या यादव राजघराण्याचा अंमल.
ई. स.१३१० - मुस्लिम अंमलाला सुरुवात.
ई. स.१३४७ बहामनी राज्याची स्थापना.
ई. स.१५४८ राजे लखुजीराव जाधव यांच्या जन्म.
ई. स.१५४८ मलीक अंबरचा जन्म.
ई. स.१५४८ ते १५९९ - संत एकनाथ.
ई. स.१५५२ - राजे मालोजी भोसलेंचा जन्म.
ई. स.१५६६ - राजे उदारामचा जन्म.
ई. स.१५६८ - ईमादशाहीचा शेवट.
ई. स.१५८५ - राजे उदाराम सम्राट अकबराच्या फौजेत दाखल.तोफखान्यावर अधिकारी.
ई. स.१५८७ - राजे उदारामला शंभर स्वारांची मनसब बहाल.
ई. स.१५९० - अफगान आणि पठाण यांच्याविरुद्ध राजे उदारामची पहिली मोहीम.
ई. स.१५९१ - राजे उदारामला सर्वप्रथम सम्राट अकबराकडून माहूरची देशमुखी बहाल.
ई. स.१५९१ - राजे उदारामला बादशहाचे तीन हजारी मनसबदार बनले.
ई. स.१५९२ - शहाजहानचा जन्म.
ई. स.१५९४ - राजे जगजीवनराव पहिले यांचा जन्म.
ई. स.१५९४ - राजे शहाजी भोसलेंचा जन्म.
ई. स.१५९४ - बुऱ्हाण निजामशाहाचा मृत्यू.
ई. स.१५९४ - मोगलांची दक्षिणेवर स्वारी राजे उदाराम आपली फौज घेऊन बादशाही सेनेबरोबर दक्षिणेत दाखल.
ई. स.१६ सप्टेंबर १५९९ - राजे उदाराम राजपुत्र सलीम बरोबर मेवाडच्या मोहिमेस रवाना.
ई. स.१५९९ - अकबराची दक्षिणेवर दुसरी स्वारी.
ई. स.१६०५ - सम्राट अकबराचा मृत्यू आणि जहागीर चे राज्यरोहन.
ई. स.१६०६ - राजे उदारामची मलीक अंबरशी भेट.
ई. स.१६०८ - सम्राट जहागिराची दक्षिण दिग्विजयास सुरुवात.
ई. स.१६०८ - राजे उदारामने स्वतःची स्वतंत्र्य कवायती फौज उभारली.
ई. स.१६१० - राजे उदाराम आणि राजे लखुजीराव जाधव यांची पहिली भेट.राजे उदाराम मोगल सेवेतून मुक्त.नोकरी सोडली.
ई. स.१६११ - राजे उदाराम आणि राजे लखुजीराव जाधव यांची दौलताबादच्या किल्यात दुसरी भेट.दक्षिणेतील मोगली आक्रमण रोखण्याबाबत दोघांचे एकमत.
ई. स.१६१२ - मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली राजे उदाराम आणी राजे लखुजीराव जाधवांच्या फौजेची जुळवाजुळव सुरू.
ई. स.१६१५ - रायबागनचा जन्म.
ई. स.४ फेब्रुवारी १६१६ - रोषणगावचे ऐतिहासिक युद्ध राजे उदाराम आणि राजे लखुजीराव जाधव यांच्या दैदीप्यमान पराक्रम राजे उदाराम आणि राजे लखुजीराव मोघलांना मिळतात.
ई. स.१६ ऑक्टोबर १६१६ - मलिक अंबर चा पाडाव करण्यासाठी खुर्रंम उर्फ शहाजहान चे अजमेरवरून प्रयाण.
ई. स.१० नोव्हेंबर १६१६ - जहागीरचे मांडवगडाच्या किल्यात बस्तान.
ई.स.१६ नोव्हेंबर १६१६ राजे उदारामला मांडव गडाच्या किल्यात सरदारकीचे वस्त्रे बहाल.राजे उदाराम बादशहाचे पंच हजारी मनसबदार बनले.
ई. स.१२ ऑक्टोबर १६१७ मलिक अंबर विरुद्ध विजयी होऊन शहाजहानचे मांडूच्या किल्यात आपल्या वडिलांकडे प्रयाण.
ई. स.१६१८ - राजे उदाराम ने मातृतीर्थाचे बांधकाम केले.
ई. स.२४ मार्च १६२२ - मलिक अंबरच्या संपूर्ण शरनागतीनंतर शाहजहानाने उत्तरेकडे प्रयाण.
ई. स.१६२३ - राजपुत्र खुर्रंम उर्फ शाहजहानाने सम्राट जहाँगिराविरुद्ध बंड पुकारले.राजे उदाराम आणि राजे लखुजीराव यांची शहाजहानला लष्करी मदत.
ई. स.एप्रिल १६२४ - शहाजहान राजे उदारामच्या आश्रयास माहुरच्या रामगड किल्यात दाखल.
ई. स.ऑक्टोबर १६२४ - शहाजहान बंगलकडे रवाना.
ई. स.१८ नोव्हेंबर १६२४ - भात वडीची लढाई राजे उदाराम चा अतुलनीय पराक्रम.
ई. स.डिसेंबर १६२४ - राजे जगजीवनराव तीन हजारी मनसबदार बनले.
ई. स.१६२५ - मलिक अंबर ची साथ सोडून शहाजीराजे विजयापूरचे सरदार बनले.
ई. स.२९ ऑक्टोबर १६२७ - जहागीरचा मृत्यू.
ई. स.४ फेब्रुवारी १६२८ - शहाजहान भारताचा सम्राट होता.राजे उदाराम बद्दल कृतज्ञता .उदारामास पदकांची खैरत.राजे उदारामाची प्रथम क्रमांकाच्या सरदारात गणना.
ई. स.२५ जुलै १६२९ - राजे लखुजीराव यांचा मृत्यू.
ई.स.३ डिसेंबर १६२९ - शहाजहान दक्षिणेच्या स्वारीवर.
ई.स.१९ फेब्रुवारी १६३० - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
ई.स.१६३० ते १६३१ - दक्षिणेत भयंकर दुष्काळ.
ई.स.नोव्हेंबर १६३० ते मार्च १६३२ - शहाजीराजे मोगलांचे मनसबदार बनले.
ई.स.७ जून १६३१ - बुन्हांनपुरला मुमताज चा मृत्यू.
ई.स.१० जून १६३१ - खान जहान लोदीचा लढता लढता मृत्यू.
ई. स.मार्च १६३२ शहाजहान चे आग्र्याकडे प्रयाण.
ई.स.एप्रिल १६३२ - राजे उदाराम चे निधन.
ई.स.ऑक्टोबर १६३२ - राजे जगजीवनराव मोगलांचे पंचहजारी मनसबदार बनले.
ई.स.२३ सप्टेंबर १६३३ - शहाजीराजे आणि मुरार जगदेव मोगलांविरिद्ध एक होतात.
ई.स.१६३५ - राजे जगजीवनराव बुंदेलखंड च्या स्वारीवर रवाना.
ई.स.२६ ऑक्टोबर १६३४ - महाबतखानचा मृत्यू.
ई.स.१६३६ - औरंगजेबाची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक.
ई.स.१६३७ - राजे जगजीवनराव ची मनसब वाढली.
ई.स.मे १६४४ - शहाजहानने औरंगजेबाला दक्षिणेच्या सुभेदारी वरून हटवले.औरंगजेबाची जहागीर जप्त.
ई.स.२९ मे १६५८ - राजे जगजीवनराव उदाराम ला सामूगडाच्या युद्धात वीरमरण.
ई.स.२१ जुलै १६५८ - औरंगजेब भारताचा सम्राट होता.
ई.स.३१ जुलै १६५८ - रायबागणला सारदारकीची वस्त्रे मिळाली.
ई.स.३१ जुलै १६५८ - रायबागन पंचहजारी मनसबदार.
ई.स.२४जानेवारी १६६१ - उंबरखिंडीची लढाई.
ई.स.२८ जानेवारी १६३१ - रायबागनचा छत्रपती शिवाजी महाराजांशी तह.
ई.स.२फेब्रुवारी १६३१ - उंबरखिंडीची लढाई समाप्त.
ई.स.२४मे १६३२ - आपल्या पांच हजार फौजेनिशी रायबागण सुरतेला रवाना.
ई.स.३० सप्टेंबर १६६४ - मिर्झाराजे जयसिंग छत्रपती शिवजीवीरुद्ध रवाना.
ई.स.२२ जानेवारी १६६६ - शहाजहान चा मृत्यू.
ई.स.२३ ऑगस्ट १६६६ - कवींद्र परमानंदला अटक.
ई.स.१६७० - रायबागणचा मृत्यू(हिजरी १०८८)
ई.स.एप्रिल १६७१ - देशमुकांचा(चिबरेकर देशमुखांना) बोलणी करण्यासाठी राजे बाबुरावणे उमरखेडला पाठवले.
ई.स.जुन १६७१ - बाबुराव फौज घेऊन उमरखेडला रवाना.
ई.स.१७०० - (हिजरी १११२) राजे बाबुराव चा मृत्यू.
ई.स.१७२८ - राजे व्यंकटराव पाहिले यांचा मृत्यू.
ई.स.१७६० - राजे शंकरराव पहिले यांचा मृत्यू.
ई.स.१७७० - राजे उद्धवराव पहिले यांचा मृत्यू.
ई.स.१७९४ - राजे नारायणराव पहिले यांचा मृत्यू.
ई.स.१८३० - राजे उद्धवराव दुसरे यांचा मृत्यू.
-प्रफुल्ल कउडकर.
संदर्भ:-माहूरच्या राजे उदाराम घराण्याचा ईतिहास(ई.स.१५६६ ते १९४८)
लेखक:-बळवंत देशमुख.