शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे.....?????
 भारतीय जनमानसावर सर्वाधिक प्रभाव असणारा नायक....
  शंकर, महादेव, आशुतोष, गंगाधर, केदारनाथ, पशुपतीनाथ, महारूद्र..... 
मस्तमलंग, निरागस मनाचा निष्पाप भोलेनाथ ते कोपिष्ट तांडव करणारा आदी..... 
    तर या शंकराचा भारतीय जनमानसावर इतका आदीबंधात्मक जो प्रभाव आहे त्याला अध्यात्मिक अर्थाने पाहिलंय, त्यामुळे त्याच्या देहावरती हि अध्यात्मिक पुटं चढली ती खरवडून काढल्याशिवाय तात्कलिन समाजातले त्याचे क्रांतीकार्य समजणार नाही व त्याशिवाय समाजाच्या जाणीव-नेणीवेवर झालेला प्रभावही समजणार नाही.... 
    . 
शंकराला अशा रितीने समजून घेणेच मुळात अत्यंत साधंसोपं आहे. ते भौतिक आहे, पण तत्कालिन प्राचीन समाजात जे त्या कालानुरूप घडत असल्याने ते आज आपल्याला अतार्किक वाटते. त्या समाजातली अतार्किक कर्मकांडं, सामाजिक संकेत हे गुंतागुंतीचं वाटतात आणि अपरिहार्यपणे ते अमूर्ताकडे नेतात. हे अध्यात्मिक वाटतं. त्यात काळाच्या मोठ्या अशा पटात या गोष्टी घडल्या असल्याने त्या अधिकच गुंतागुंतीच्या वाटू शकतात पण त्या बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धतीने समजून घेतल्या तर त्या काळाचा त्रिमितीतून ( Three Dimensions) मधून धांडोळा घेणं शक्य आहे..... 
#शंकर_कोणत्या_प्राचीन_समाजाचे_अपत्य_आहे?? 
   शंकर प्राचीन अशा अर्धपशुपालक व अर्धशिकारी ( Semi Pastral, Semi Huntrar) समाजाचे अपत्य आहे, जो संपूर्णतः पशुपालकही नाही व पूर्णपणे शिकारीही नाही. मृगयाजीवी (शिकारीजीवी) समाजाची पुढची स्टेज असते पशुपालन. अशा दोन्ही अर्धवट अन्नचयनाच्या पद्धतीतून तो समाज धडपडतोय.  शिकारीसमाज जो मूलभूत आहे त्याचं स्थिरस्थावर दोनप्रकारे होतं १)पशुपालन (जो पशुंना माणसळवतो) २)शेती 
    आता हे शिकारीसमाजाचे स्थिरीकरण आहे ते भौगोलिक परिस्थितीवर आधारित आहे. उदा. जर शिकारी समाज जर वाळवंटात गेला तर शेतीत उतरण्याची शक्यता जास्त,  तो समाज कृषक बनतो कारण वाळवंटात पशुपालन शक्य नसते  तर हा टोळीसमाज गवताळ प्रदेशात गेला तर पशुपालक होतो जिथे पशुपालनापासून पशुधन निर्माण होते. शंकर अशा अर्धशिकारी अर्धपशुपालक टोळीसमाजाचा प्रतिनिधी होता. टोळीसमाज मूळचा जमात असतो व रानटी अवस्थेत असतो. टोळीसमाज प्रगत होण्याच्या दोन शक्यता असतात. 
१) पशुपालन २) शेती
    पशुपालनाआधी पशुंना माणसाळवण्याचा ( Domestication) जो कालखंड आहे तो प्राचीन समाजात इसवी पूर्व १०,००० वर्षातच झालेला आहे.  टोळीसमाज रानटी शिकारीतून आला व पशुपालक बनला. 
महादेव अशा समाजातून आला होता. जागतिक भौगोलिक स्थानातून जर पाहिले तर उत्तर ध्रुवाकडून खाली सरकताना रशिया, तुर्कमेनिस्तान, बॅक्ट्रिया अशा गवताळ पट्ट्यातून, कुरणातून मंगोल, शकांच्या टोळ्या खाली सरकत होत्या त्यातीलच एक टोळी हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे मानसरोवरातील पलीकडून खाली सरकली महादेव अशांपैकीच एक होता असं म्हणता येईल.... 
      अशा अर्धशिकारी व अर्धपशुपालकांचे जे ध्येय आहे ते आहे शेतीत स्थिरस्थावर होणे.... त्यावेळेस तो सिंचनाच्या (Irrigation) च्या पद्धतीवर काम करतो. 
.. 
उमापार्वती कोण आहे??? 
शिवाबाबत सांगितलेल्या प्रत्येक पुराणकथेत शिव-पार्वती संवाद होताना तिला प्रश्न विचारताना दिसतो. ती कुण्या ब्रम्ह्याचे पाय दाबत बसणाऱ्या स्त्री सारखी दुय्यम दिसत नाही, तर ती उर्जावान व प्रतिभाशाली भासते.... 
      तंत्रात स्त्री ला कुल म्हटलेय तर पुरुषाला - अकुल.…. 
म्हणून तो खऱ्या अर्थाने धन व ऋण शक्ती एकाच कुलात नांदते असे प्रतीत होते. 
        उमेशिवाय शिव नाही आणि शिवा शिवाय उमा नाही अशी ती #अर्धनारीनटेश्वरी समता आहे..
        त्यामुळेच शिवाला संपूर्ण भारतीय कन्टेस्टमध्ये नटेश्वर, हरिहर असं स्त्रीपुरूष रूपात स्विकारलंय.... 

   उमेला पार्वती व शैलजा  म्हटले गेलेय कारण ती शैल(जा) म्हणजे पर्वतकन्या.. वा पार्वती (पर्वतकन्या) असे म्हटले गेलेय. 
     उमा मूळची अतिउत्तरेकडील टोळीसमाजातूनच आलेली आहे. तो टोळीसमाज अर्धकृषक (Semi agregrian) व अर्धशिकारी (Semi Huntrar) आहे. उमा हि अर्धकृषक आहे कारण ती तलावाकाठी दलदलीच्या प्रदेशात गाळपेराची शेती करत आहे. ती शेती जंगली साळी ( Wild Rice) ची व जंगली गव्हाची आहे. जंगली साळी हा काळा तांदूळ मानवी सभ्यतेचा प्राचीन इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रचंड महत्त्वपूर्ण ठरला. या जंगली साळीवरच कॉ. शरद् पाटलांनी आपला महाशोध उभारला. जंगली साळी ला बुद्धांनी अक्टठपाको हा पाली शब्द वापरला आहे. 
       आता याही अर्धकृषक समाजही अप्रगत अवस्थेत अन्नचयन करत असतो त्यालाही शेतीच्या प्रगत अवस्थेत गेल्याशिवाय वरकड उत्पादन ( Surplus) मिळणार नाही. म्हणून तलावाकाठी शेती करणारा हा समाज नदीवक्त्र (नदीने ओकलेल्या गाळात गाळपेराची शेती) भागात उतरला. 
   हि शेती गंगा, भागिरथी ते पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या काठाभोवती विकसित झालेली दिसते. 
     परंतु हेही मोठ्या प्रमाणात घडताना दिसत नाही. अशावेळी केदारनाथ (ज्या शब्दाचा मूळ अर्थ आहे पाणी वळवणारा) कामाला येतो. 
  . 
शिवपार्वती शक्तीसंगम.

शिव व उमेचं तत्कालिन क्रांतीकर्म काय आहे??? 
कोणता सगळ्यात महत्वपूर्ण विरोध त्यांनी मिटविला??? 
ज्याचे पडसाद संपूर्ण भारतीय उपखंडावर उमटले .... 
शिवपार्वतीविवाह संपूर्ण भारतात अजूनही उत्साहात साजरी करण्याची भारतीय जनमानसाची सामूहिक नेणीव काय आहे??? 

जगभरात अशा दोन्ही प्रकारच्या टोळीसमाजात संयोग झाल्याचे उदाहरण नाही. अशाप्रकारच्या दोन व्यवस्था असणाऱ्या समाजात प्रचंड मोठा संघर्ष झाल्याची उदाहरणे आहेत परंतु हिमालयाच्या पायथ्याशी हा जो वैमनस्यभावी संघर्ष आहे तो अवैमनस्यभावात म्हणजे मित्रभावात मावळताना दिसतो. पार्वतीच्या स्त्रीसत्ताक समाजाला सिंचित शेती करण्याचे तंत्र मिळाले तर शंकराच्या पशुपालक पुरूषप्रधान समाजाला गाळपेराच्या शेतीचे तंत्रज्ञान मिळाले अशाप्रकारे देवघेव झाली. साहजिकच शिवपार्वतीच्या एकत्र येण्याने हे दोन्ही समाज एकत्र गण बनतात. उत्पादन वाढते.

 गणासमोरचा अन्नधान्याचा प्रश्न मिटतो त्यामुळेच कला जन्मू लागतात. शंकरासमोरचा सजलेला नंदी असाच कलात्मक प्रभावातून ( Artistic Impression) मधून आलेला आहे. 

     आता हा जो या दोन व्यक्तीतून दोन विरोधग्रस्त समाजातला संघर्ष मिटतो , शांतता प्रस्थापित होते, उपयुक्तता समजते त्यातून समृद्धतेतेला चालना मिळते त्यातून त्याचे प्रभाव जलद रितीने खाली सरकू लागतात. या प्रक्रियेतूनच श्रद्धाभाव, पूज्यभाव जन्म घेतो..... 
     हि प्रक्रिया हिमालयातून मग तीन मार्गाने खाली सरकली. 
१) सिलिगुडी, आसाम, प. बंगाल, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश ते तामिळनाडू.... 
२) मध्यप्रदेशाच्या सीमेवरचा विंध्याचल ओलांडून महाराष्ट्रातील अमरावती मार्गे खाली
३) उत्तरभारतातून नाशिक ते कोकण मार्गे खाली..... 
     हा शिवशक्तीसंगमाचा आदीबंधात्मक ( Architypical) प्रभाव निर्माण झाला. समाजाला हे स्त्रीपुरूष समतेचे प्रतिक वाटले म्हणून हरिहर, अर्धनारीनटेश्वर अशा स्वरूपात त्याला पाहणे आवडले. शिवपार्वती विवाहाचा प्रभाव अजूनही संपलेला नाही लोक अजूनही खेड्यापाड्यातल्या शिवमंदिरात शिवपार्वती विवाह लावतच आहेत. 
निर्ऋतीच्या तंत्राच्या तुलनेत तो लोकप्रिय का झाला???? 
        नटेश्वर - : तर याचे उत्तर त्याचे हे तत्कालीन क्रांतिकारी कार्य कलेद्वारे जनमानसात नेण्यात तो यशस्वी झाला म्हणून तो आद्य  डान्सर आहे. 

महारूद्र - : वैदिकी मध्ये जे जे काही गूढ, निषिद्ध, भीतीदायक दाखवले आहे त्याला तो भिडला. मानवी प्रेताचा स्पर्श वैदिकी ने निषिद्ध मानला तर शिव थेट स्मशानातच जाऊन बसू लागला म्हणून त्याला महारूद्र असे म्हटले गेले आहे. 

बाकी शंकराचे जे अध्यात्मिक प्रभाव बनले त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते त्यावर मी या पोस्ट मधून लिहिलेले नाही. 
  अशाप्रकारे आकलनाचा पैस वाढवण्याचा प्रयत्न प्रबुद्ध समाजाने केला तर श्रद्धाभाव पूज्यभावाची पुटे गळून पडून तात्कालातील मानवी समाज बदलणाऱ्या अशा महान व्यक्तीबद्दल फक्त निखळ असा आदरभाव निर्माण होईल संदर्भ:-
१) शरद् पाटिल समग्र.
२) राजकुमार घोगरे विविधा.

Popular posts from this blog

Mechanic Labour Union

माहूर ची chronology (कालपट)