किल्ले रामगड(माहूर)
किल्ले रामगड(माहूर)ता.माहूर.जी.नांदेड.
किल्ले रामगड(माहूर)चा मुघलांच्या कालखंडात माहूर शी संबंध आला होता.ह्या ही आधीची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा लवकरच ह्या ही आधीची माहिती मिळवू.
अशीरगडवर सुभेदार असलेल्या खुर्रम (नंतर शहाजहान) याने त्यांचे वडील,दिल्लीचा बादशहा जहांगीर याच्या विरूद्ध बंड पुकारलं होतं.त्यामुळे जहांगीरच्या फौजा खुर्रमवर चालून आल्यात. त्या फौजांपासुन पळ काढून निघालेल्या खुर्रमला मार्गात कोणीच आसरा देईना झाले. माहुरच्या देशमुखांनीच फक्त त्याला आश्रय दिला होता. त्यावेळेस खुर्रमचा लहान मुलगा औरंगजेबदेखील त्याच्यासोबत होता. पुढे जहांगीर व खुर्रममध्ये समेट होऊन औरंजजेबाला जहांगीराकडे ओलीस जावे लागले.
औरंगजेबाने त्याच्या बालपणातील काही दिवस माहुरला घालवले आहेत.
पुढे खुर्रम बादशहा बनला, शहांजहान या नावाने तेव्हा माहुरचे जगजीवनराम देशमुख शहाजहानच्या वतीने अफगाणिस्थानात कंधारच्या मोहिमेवर लढताना वीरगतीस प्राप्त झाले होते.
जगजीवन राम देशमुख वीरगती प्राप्त झाल्या नंतर सावित्रीबाई देशमुख उर्फ रयबागण हिने तब्बल 25 वर्ष राज्य कारभार सांभाळला.
शहाजहान सोबत त्यावेळी मुंमताजमहाल,दाराशूकोह,आणि औरंगजेब होते.त्यांना अहमदनगरच्या निजामशहा मलिक आंबरनेही आश्रय दिला होता, त्या काळात हे कुटुंब माहूर ला नक्की असेल,पण त्यांना इतर कुणीच आश्रय दिला असेल असे म्हणता येणार नाही याबाबत सेतू माधवराव पगडी यांनी केलेल्या सांशोधनानुसार शहाजहान जुन्नर,संगमनेर आणि नाशिक येथेही आश्रयाला थांबला होता,संगमनेर च्या गढीत अनेक दिवस हा परिवार थांबला होता.2मार्च 1626 रोजी जहागीर चे सैनिक संगमनेर ला आले आणि त्यांनी दारशुकोह आणि औरंगजेब यांना ओलीस म्हणून ताब्यात घेतले.त्याच दिवशी शहाजहानने संगमनेर सोडले आणि नाशिक ला गेला पुढे 1627 मध्ये जहागीर चे निधन झाले आणि शहाजहान चा मुलगा बादशाह झाला.
अशीर गडावरून नर्नाळा मार्गे माहुर करून पुढे पूर्वेला बंगालात ढाका, चितगाव जाण्याचा प्रयत्न होता असं वाचल्याचं आठवतं. माहुरला तर तो नक्की आलाच होता.
माहुरच्या सावित्रीबाई उर्फ रायबागन, ज्या शाहिस्तेखानाने कोकणात पाठवलेल्या कारतलब खानाच्या फौजेत होत्या. छत्रपतींनी उंबरखिंडीत गाठून मार दिला होता कारतलब खानाला.
सावित्रीबाई फार धाडशी. किनवटच्या राजाने माहुरवर हल्ला केला होता तेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या तुटपुंज्या शिबंदीला किनवटच्या राजाच्या फौजेविरूद्ध प्रेरित करायला सावित्रीबाईंनी ध्वजदंडावर ध्वज म्हणुन स्वतःची चोळी लावली होती म्हणतात, किनवटच्या राजाचा पराभव झाला यामागे रायबागण = राजव्याघ्री यांचा पराक्रमच होता.