हो कंम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांनी मुंबई महाराष्ट्रात आणली.लढा संयुक्त महाराष्ट्राचा.१ मे महाराष्ट्र दिवस.
हो कम्युनिस्टांनी मुंबई महाराष्ट्रात आणली ! कॉ डांगे , कॉ अण्णाभाऊ साठे, कॉ अमर शेख, कॉ नाना,प्रबोधनकार, अत्रे, एस एम जोशी, भाई केशवराव जेधे अन भरपूर कामगार......
वर्ग संघर्ष (इतिहास कामगारांचा )
#लढा_संयुक्त_महाराष्ट्राचा_लढा_कामगारांचा
या लढ्याला मुबंई साठिचा, कामगारांचा, मराठी भाषिकांचा लढा म्हणता येईल .. एकंदरीत 4 टप्प्यामधे हा वर्णन केला जाऊ शकतो ..
पहिला टप्पा म्हणजे (१९४६ ते नोव्हेंबर १९५५) या दरम्यान SRC स्टेट reorganization कमिशन ज्यावर non महाराष्ट्रीयन काँग्रेसीच प्रभुत्व होत त्यांनी भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती व रचना करण्याचं धोरण हाती घेतल होत . मुबंई हे seperate राज्य असावं हा अट्टहास बॉम्बे सिटीझन कमिटी ने धरला होता.
एकूणच विरोधी पक्ष ज्यात मुख्यत्वेकरून किंबहुना पूर्णपणे डावे समजवादी कम्युनिष्ट नेते यांनी SRC वर तोफ डागत मुंबई महाराष्ट्रात च राहिली पाहिजे यावरून रणशिंग फुंकारले आणि ६ फेब्रुवारी १९५६ साली भाई केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची पुणे येथे स्थापना झाली ..
समितीचे नेतृत्व हे कॉम्रेड श्रीपाद डांगे , कॉम्रेड शाहीर अमर शेख , समाजवादी नेते एस एम जोशी ,कॉ मिरजकर ,भाई पाटील , ना ग गोऱ्हे शंकर राव देव, नर्वे, डी व्ही पोतदार यांसारख्या दिवंगत जास्तकरून डाव्या नेत्यांनी केले .
सयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागणीला SRC ने मुजोरा तर दिलाच नाही वर महा विदर्भाला च वेगळं राज्य करण्याचा निर्धार केला . उद्योगपतींच्या मागणीला SRC चा soft कॉर्नर होता यात दुमत नाही .SRC ने स्वतंत्र मुबंई राज्याच्या निर्मितीवर शिक्का मोर्तब केला . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचे नेते गोळवलकर यांचाही काँग्रेसलाच पाठींबा होता म्हणजेच ते मुबंई वेगळे राज्य व्हावे यास अनुकूल होते.
दुसरा टप्पा .. म्हणजे (नोव्हेंबर १९५५ ते फेब १९५६) यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती हि अस्तित्व अंधुक असलेल्या अवस्थेत होती. सत्तेच्या जोरावर काँग्रेसने दबाव यंत्रणा राबवून लोकांच्या विरोधाची मुस्कटदाबी केली . Parliment मधे निर्णय होईसपर्यंत बॉम्बे कॉर्पोशन ने मुबंई महाराष्ट्रात राहील याचा ठराव पास केला.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वाला कुठल्या निर्णयाला मुजोरा द्यावा यावर ठाम मत नव्हतं. तत्कालीन महाराष्ट्रातील व कॅबिनेट मधे वर्चस्व असणारे नेते C D देशमुख यांनी मात्र काँग्रेसला या कृतीवर विरोध दर्शविला . पंतप्रधान नेहरू नि हि कुठलीही चाचपणी न करता स्वतंत्र मुबंई राज्य यावर शिक्का मोर्तब केला . केंद्रातील काँग्रेसच्या या निर्णयाला नाराज महाराष्ट्र वासीयांनी आंदोलने केली , आणि याचीच प्रतिभूती म्हणून 105 कामगार जे कि या लढ्यात डाव्या संघटनेद्वारे सामील झाले होते त्याना आहुती द्यावी लागली मोरारजी देसाई व S K पाटिल यांनी गोळीबाराचा आदेश सोडला .
तिसऱ्या टप्प्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना( ६ फेब्रुवारी 1956) झाली होती महाराष्ट्रातील काँग्रेसी नेत्यांचा नाकर्तेपणा दुटप्पी भूमिकेमुळे त्रस्त लोक कॉ डांगे व जोशी ना जाऊन मिळाले त्यांनि यशस्वी रित्या लोकांना मुंबई सहित असलेला महाराष्ट्र त्याहूनही अधिक विदर्भ पण त्यात समाविष्ट असलेला महाराष्ट्राची चाहूल लावली आणि थोड्याच कालावधीत कामगार कष्टकरी मराठी भाषिकांनी मिळून त्याला सत्यात आणले.
चवथा टप्पा ( नोव्हेंबर १९५६ ते मे १९६०) म्हणजे काँग्रेसला लागलेली उतरती कळा समिती ने ( डाव्यांनी) लोकांचा विश्वास जिंकला संयुक्त समितीने 133 पैकी 101 जागांवर विजय नोंदवला सगळीकडे काँग्रेसमधे असंतोष निर्माण झाला. याच काल खंडात समितीने तीव्र सत्याग्रह केला.
१९६२ मधे होणाऱ्या निवडणुकावरील होणारा परिणाम लक्षात घेऊन काँग्रेसी केंद्र नेतृत्वाने माघार घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली ..