किल्ले रामगड(माहूर)

किल्ले रामगड(माहूर) विषयी थोडीफार ऐतिहासिक माहिती,महत्त्वाची माहिती म्हणजे ई. स.५८७ साली माहूर चा रामगड किल्ला जेमसिंग नावाच्या राजपूत राजाने बांधला,म्हणजे १४३५(एक हजार चारशे पस्तीस) एवढा जुना हा किल्ला आहे आणि माहूरचे राजे उदाराम ह्यांना सम्राट अकबराने दिल्लीची बादशाही उदाराम घराण्याला पादशहीचे सेवक न समजता(खलील) 'विश्वासू' मित्र समजत होते.दक्षिणेतील पदशाह्यांवर बारीक नजर ठेवणारा उदाराम शिवाय दुसरा सरदार कोणी ही नव्हता.कारण बादशहाने उदाराम चे शॉर्य आणि धडाडी पाहिली होती.अनेक छोट्या मोठ्या लढायांत पहायला मिळाली होती.उदाराम च्या शेकडो गावांपैकी काही ठाणी महत्वाची होती.त्यातली माहूर आणी वाशीम ही उदारामची दोन प्रमुख ठाणी होती.जहागीर चा कारभार व्यवस्थीत चालावा आणि सरहद्दीवर नीट लक्ष ठेवता यावे म्हणून माहूर चा रामगड किल्ला सम्राट अकबराने उदारामला देऊन टाकला.माहूर चा रामगड किल्ला ई. स.१५९१ सलापासून ते ई.स.१९४८ पर्यंत म्हणजे जवळ जवळ चारशे वर्ष उदाराम राजघराण्याच्या ताब्यात होता.
-प्रफुल्ल कउडकर.
संदर्भ:- माहुरच्या राजे उदाराम घराण्याचा इतिहास(ई. स.१५६६ ते १९४८) -  बळवंत देशमुख,निर्मल प्रकाशन नांदेड.
#माहूर_एक_ऐतिहासिक_शहर #माहूरचा_इतिहास #mahur_fort

Popular posts from this blog

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

राम आणी रावण.

ट्रम्पच्या २५% भारतावरील कर आकारणीचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे?