रॅप मोठा होतोय.
रॅप मोठा होतोय...
=========
सृष्टी तावडे नावाची एक नवीन रॅपर गेल्या महीन्यापासून सोशल मिडीयात धुमाकुळ घालत आहे, म्हणून तीचे काही गाणी ऐकली... तिच्या बाबत जाणून घ्यायचा प्रयत्न केला... ती आधी कविता करायची आणि content writer ची नोकरी करायची, एक डेटींग ॲपवर कोणा एकाला आपले रॅप ऐकवत असतांना कोणीतरी तिला MTV Hustle 2.0 च्या ऑडीशनला जा म्हणून सुचविले... आणि तेथे तिची निवड झाली, तिच्या गाण्यातला आणि लिखाणातले नाविन्य आणि ताजे पणा मुळे रातोराती ती स्टार झाली...
खरं तर भारतातलं खास करून मुंबईतील रॅप सीन हे झोपडपट्टीतील मुलांनी सुरू केलं आहे त्यांच्यात खुप वितुष्ट आणि स्पर्धा आहे, एकमेकांना शिव्या देणे (Diss) करण्याशिवाय ज्यास्त काही त्यात दिसत नाही, तरी काही गाणी (मेरी गल्ली मे) इतकी मोठी झाली की त्यांच्या प्रसिद्धी मुळे बॉलीवुडी नजर त्यांच्या वर गेली आणि झोया अख्तरने गल्ली बॉय नावाचा गल्लाभरू पण चांगला सिनेमा काढला.
मी अनेक वर्षांपासून रॅप फॉलो करीत आहे, नेझी, डिवाईन, एमीवे, कामभारी, सारखे मुंबईच्या गल्लीतून येणारे रॅपर मोठे झालेले पाहीले आहेत... आता MTV सारखे मोठे ब्राँड यात MTV Hustle 1 पासून या मार्केटमधे आपला हिस्सा पक्का करण्यासाठी उतरले आहेत...
त्यामुळे प्रथमच देशात खरे(Underground) रॅपर विरूद्ध इंडस्ट्री(Corporate) रॅपर असा संघर्ष सरू झाला आहे... हे सगळे फॅलो केलं तर कळतं की... भारतात संगीत क्षेत्रात प्रथमच हाडाचे आणि कोणतीही परंपरा नसणारे लोक आपल्या लिखाणाच्या, गाण्याच्या वर संगीत तयार करण्याच्या कुवतीवर, युट्यूबर सारख्या माध्यमातून मोठे होत आहेत... आणि तरूण मुले यांना जोरदार फॅलो करीत आहे..
हाडाचे म्हणजे... पुर्वी लोक संगीत गाणारे आणि जगणारे हाडाचे कलाकार होते... मनोरंजनांची माध्यमे मोठी झाली तशी... त्यातले काही मोठे झाले... पण आता लोकांना काय हवे, जे चालते ते बनते आणि मुझिक कंपन्यांच्या तालावर संगीत बनू लागले..
हाडाचे म्हणजे... अनेक परदेशी रॉक आणि रॅप स्टार्स गाणी स्वता लिहतात, संगीत देतात आणि गातात... जी फिलॉसॉफी मानतात ती जगतात... मोठे होता... त्यांना कल्ट फॅलो करतो... आणि ते त्यांच्यासाठीच जगतात... काही एक गाण्यापुरती मोठे होतात तर काही सतत... मोठे होत जातात...
भारतात असे होत नाही... खास करून सिनेमा, गझल, पॉप आणि डाँस संगीतात... ते curated करून... ट्रेंड प्रमाणे अनेक संस्कार करू बनविले जाते... शास्त्रीय संगीत तर परंपरा आणि श्रेष्ठत्वाच्या चौकटी बाहेर येत नाही... काही प्रयोग आपवाद...
मग मुंबईतील झोपडप्पटीतील रॅपर्सने नेमकं काय केलं... ते जिथे जगायाचे ज्या जगात वावरायचे... त्यांच्या बाबत त्यांनी लिहलं... गायलं... तेही unapologetically (कोणाचीही तमा न बाळगता)... त्यांनी शिव्या लिहल्या, हिंसा लिहली... सोवळं पाळले नाही... नियम पाळले नाही... आणि अतिशय आत्म विश्वासने... स्वताच्या खर्चाने.. मोबोईल वरून शूट करून यूट्यूबर टाकले... आणि प्रसिद्ध झाले... आणि एक नवीन संगीत क्षेत्राला जन्म दिला...
त्यामुळेच... मध्याम वर्गिय सुखवस्तु सृष्टी तावडे आणि अमरावतीची आर्या जाधव (QK) ह्या मुली आता वेगळं लिहण्याच्या जोरावर प्रसिद्ध होत आहेत... दिल्ली, गाजीबाद, कोलकत्ता आणि देशातल्या अनेक बकाल वस्तीत राहणारे तरूण आता स्वताचे संगीत बनवत आहेत... त्याची प्रतीबिंब सद्याच्या MTV Hustle 2.0 मधे आहेच... पण youtube वर तर धामाल चालू आहे...
या सगळ्यांमुळे अनेक प्रकारेच रॅपर पुढे आलेत... मराठी रॅपर संबाटा जोगदंड ऐका (OG) जबारदस्त आहे... आंबेडकरी रॅपर विपीन तताड आहे... आदीवासी रॅपर आहेत... आणि स्त्रीयांच्या प्रश्नावर रॅप करणारे आहेत, पर्यवरणावर रॅप करणारे आहेत...
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे... हे सगळे स्वता गाणी लिहणारे आहेत... मला याबाबत खुप कौतुक आहे... बॉलीवुड मधे प्रसंगाधारीत गाणी संगीत रचणे आणि त्या संस्कृतीच्या फुटपट्टी बसविणे, गाणारा वेगळा, लिहणारा वेगळा, संगीत देणारा वेगळा आणि सिनेमात शुट वेगळ्या हिरो-हिरोईनवर... यात एकजीनी पणा नाही... आणि चोरांचा तर सुळसुळट.... या पेक्षा उस्फुर्तपणे लिहणारी, गाणारी हि पढी मला खुपच आशावादी वाटते..
सृष्टी तावडे ही त्याच माळेतील एक मणी आहे... तिचे Chill Kinda Guy ऐका... आर्या जाधवचे... Drop it Draupadi हे गाणं जरूर ऐका... आणि MTV Hustle 2.0 ची सगळी गाणी ऐका... त्यात गाणारे रॅपर सतत म्हणतात... हे गांण मी लिहलं आहे मला यातून अमुक एक सांगायचे आहे... हे प्रश्न मांडायचे आहे... असं बिंधास्त म्हणतात... EPR ची गाणी तर भन्नटच आहेत...
देशात ८० पासून रॉक गाणारे व ऐकणारे रॉकची फिलॉसोफी पेक्षा म्यूझीक आणि गिटारवर बोलायची... पण ही मुले... गाण्यातील मांडणीवर बोलतात... हे माझ्यासाठी चेंज आहे...
काही रॅपर्स तर करोडो कमवत आहेत, युट्यूबर व्हिडीयो त्यांचे करोडोंनी पाहीले जातात... म्हणून MTV सारखा corporate ला यात हिस्सा हवाय... ते सगळ्यांना परत संस्कृतीत बसवेल ही...
म्हणून सगळ्या सुस्कांरी काका-काकूंना सांगतो... रॅपचा underground सीन जरूर फॅलो करा... आणि त्यांचा उर्मटपणा ऐका... सहन करा... संगीतात आयुष्य बदण्याची ताकत असते... आणि कटु सत्य सांगण्याचीही...
- SG
PHOTO - EMIWAY एकट्याने कोणात्याही संगीत कंपनी बरोबर न जाता फक्त youtube आणि फॅन्सच्या आधारे १८ लाख subscriber असणारा स्वता Bantai म्युझीक लेबल बनवून पुढे जात आहे... त्याची दखल Rolling Stone ने घेतली आहे आणि सृष्टी तावडे MTV Hustle 2.0