ज्ञानाच्या अथांग सागरास क्रांतिकारी अभिवादन! 🌹🌹🙏

"अदिम अवस्थेच्या टोळ्यांत फिरणाऱ्या स्वैर संभोगी द्विपाद पशूंच्या झुंडीपासूनचा अँथ्रोपॉलिजिकल स्टडी......
   अॉस्ट्रिक, मेरेडियन, आर्यन्स, निग्रोलाईडस्, मंगोलियन द्रविडियन्स वांशिक समाजाचे लिनिएज...
      सिंधू, मेसोपिटियन, मोसूए ते ग्रीक सभ्य नागर संस्कृत्या.... प्राचीन ते अर्वाचीन....
     वंशसमाज ते चातुर्वर्ण्य
वेद, उपनिषदे, पुराणे, ब्राह्मण्यके, आरण्यके, श्रुती स्मृती, संहिता..... 
.
     जातीचा आर्किमिडियन स्टँडपॉईंट  ते वर्गसमाज,
प्रो. सेलिंग्मन, प्रो. मॅक्समुल्लर ते जॉन ड्युईच्या प्रॅग्मिटिजम पर्यंत... 
अर्थशास्त्राच्या अथ पासून इति पर्यंत....

   आधुनिक भांडवलदारी ते राज्य समाजवादापर्यंत......
    पाण्याच्या मानवी मूलभूत हक्कांपासून ते माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचे संविधानिक अधिकारापर्यंत..
.
 अशा सगळ्यांचं डायलेक्टिक्स आपल्या थ्री डायमेन्शियल चष्म्यातून बघणारा एक विद्वान मनुष्य......
      या सगळ्यांच्या पसाऱ्यात मानवी दास्याचे गुलामीचे मूलभूत कारण शोधतोय...!!!
      स्वतःवर आलेलं, भोगलेलं प्रत्येक ह्यूमिलिएशन... प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान, प्रत्येक उपहास.. बैलानं कातडीवर फेकलेला खडा सहज उडवून लावावा असा उडवून भिडला समष्ठीच्याच मुक्तीला......!!!

      तथागतांचे प्रचंड कारूण्य, कबीराच्या दोह्याची दाहकता अन ज्योतीरावांचे जाणीवानेणीवा पेटवणारे सांस्कृतिक चिंतन, पाझरून, झिरपून घेऊन स्वतःतच, चालत गेलास तु हे माझ्या बापा, 
     निद्रिस्त मेंदूचे प्रदेश पेटवत..... 
रातकिड्यांच्या टिमटिमणाऱ्या तंतूपासून ते धूमकेतूंच्या वेगवान प्रकाशात नेलेस तु आमच्या पिढ्या.......!!!!
       नालंदा, वल्लभी, विक्रमशिला, तक्षशिलेचे ते धम्मचक्रप्रवर्तन केलेस पुन्हा ऑक्सफर्ड, केंब्रिज, बॉन, हॉवर्ड ते स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीपर्यंत... गेलोय आता आम्ही..... हे पिढ्यांवर केलेस तु आमच्या उपकार अन संस्कार.....!!!!
        मुक्तीचं तत्वज्ञान.... 
पाणपोईतलं पाणी कुणीही येऊन, पिऊन पुढे निघावं, 
इतकं मुक्त....!!!
      डॉ. भिमराव रामजी आंबेडकर हा केवळ माणूस नाही तर एक विचार आहे, उत्तरोत्तर पेटत जाणाऱ्या अॅटमसारखा, गुणाकारात पेटत जाणाऱ्या क्वांटम थिअरी सारखा...!!! 
      तो कधीच असा मरतबिरत नसतो, तर उर्जा अक्षय्यतेच्या नियमासारखं त्याचं फक्त रूपांतरण होत असतं पुन्हा नव्या उर्जेत.....!!!! "
.

Popular posts from this blog

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

Mechanic Labour Union

माहूर ची chronology (कालपट)