Posts

ट्रम्पच्या २५% भारतावरील कर आकारणीचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

Image
ट्रम्पच्या २५% भारतावरील कर आकारणीचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय निर्यातीवर २५% कर लादण्याचा निर्णय घेतल्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि जेनेरिक औषधांपासून ते दागिने आणि ऑटो कंपोनंट उत्पादनांपर्यंत अनेक क्षेत्रांना फटका बसणार आहे.जगातील सर्वात जास्त असलेल्या इंडस टॅरिफमध्ये ड्रमने बुधवारी सत्य सोशल प्लॅटफॉर्मवर कोणत्याही देशाच्या सर्वात कठीण आणि घृणास्पद नॉन-क्षणिक व्यापार अडथळ्यासह पोस्ट केले. रशियाकडून देशाच्या ऊर्जा खरेदीमुळे त्यांनी अतिरिक्त दंड देखील ठोठावला.फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाय-प्रोफाइल व्हाईट हाऊस भेटीनंतर, व्यापार चर्चेत वॉशिंग्टनला सहभागी करून घेणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असूनही, प्रादेशिक समक्षांपेक्षा नवी दिल्लीला प्राधान्य देण्याची आशा या घोषणेमुळे धुळीस मिळाली आहे. व्हिएतनामवर २०% तर इंडोनेशियावर १९% आणि जपानवर १५% कर आहेत.ब्लूमबर्ग न्यूजने भारताच्या अंतर्गत गणनेशी परिचित असलेल्या एका व्यक्तीच्या हवाल्याने जुलै ते सप्टेंबर या काळात जर टॅरिफ २५% पेक्षा जास्त झाला तर ए...

ऐ भगतसिंग तू जिंदा हैं

Image
भगतसिंगाने आयुष्यात एकदाच पिस्तूल झाडले आणि एकदा अहिंसक आवाजी बॉम्ब टाकला. मुद्दा खरा भगतसिंह जाणून घेण्याचा आहे !! भगतसिंहाचे सहकारी कॉ. शिव वर्मा यांनी 'संस्मृतियाँ' मध्ये आणि पुण्यात १९८५ मध्ये सांगितलेली आठवण. भगतसिंहाच्या  "... लांब ढगळ सदऱ्याच्या एका खिशात पिस्तूल आणि दुसऱ्या खिशात पुस्तक असे" आणि " सुनसान रस्त्यावरून चालतानाही तो पुस्तक वाचत असे".  भगतसिंहाचे दुसरे सहकारी जितेंद्रनाथ सन्याल यांनी  "त्यावेळी देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ज्या अभ्यासू राजकीय व्यक्ती होत्या त्यापैकी एक" असे त्याचे वर्णन केले आहे. तर "लाहोरच्या तुरुंगाचे रूपांतर त्याने विश्वविद्यालयात केले होते" असेही म्हटले गेले आहे. इयत्ता 4 थीमध्ये असताना भगतसिंहाने सरदार अजितसिंह (त्याचे काका आणि पंजाब प्रांतातील जहाल नेते), लाला लजपतराय व अन्य नेते यांच्या तसेच राष्ट्रीय राजकीय घडामोडींबाबतच्या कात्रणांच्या अनेक फाइल्स वाचून काढल्या होत्या. एवढेच नव्हे तर सरदार अजितसिंह, सूफी अंबा प्रसाद आणि लाला हरदयाल यांनी लिहिलेल्या व अन्य अशा सामाजिक-राजकीय ...

Mechanic Labour Union

Image
मेकॅनिक्सचा परिचय आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांची भूमिका यांत्रिकी वाहनांची तपासणी, निदान, देखभाल आणि दुरुस्ती करतात . त्यांना ऑटोमोटिव्ह प्रणाली आणि घटकांचे सर्वसमावेशक ज्ञान असते . त्यांच्याकडे दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक साधने आणि तंत्रे देखील असतात . मेकॅनिक्स स्वतंत्र गॅरेजपासून मोठ्या ऑटोमोटिव्ह डीलरशिपपर्यंत वेगवेगळ्या सेटिंग्जमध्ये काम करू शकतात. भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी यांत्रिकी आवश्यक आहे , जे दरवर्षी अर्थव्यवस्थेत अब्जावधी रुपयांचा योगदान देतात. यामुळे ते देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक बनलेला व्यवसाय आहे. भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योग यांत्रिकीशिवाय कार्य करू शकणार नाही, जे वाहने सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करण्यासाठी जबाबदार आहेत. वाहने रस्त्याच्या योग्य ठेवण्यातही यांत्रिकी महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण वार्षिक एमओटी चाचणीत अयशस्वी होणारे कोणतेही वाहन पात्र मेकॅनिकद्वारे दुरुस्त केले जाते. मेकॅनिक्स भारताच्या आर्थिक समृद्धीमध्ये कसे योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेत मेकॅनिक्स महत्त्वाची भूमिका बजावतात, ...

आईचे हृदय - माहुर

Image
आईचे हृदय - माहुर              माहुर हे सर्वप्रथम मनुष्यवस्तीखाली आलेले अत्यंत प्राचीन ठिकाण आहे.सपाट मैदानी प्रदेश हे पुर्वीला दलदलीखाली किंवा बहुतांश जलमय असताना,त्या काळात मनुष्य वस्ती ह्या उंचावर , डोंगर माथ्यावर झालेल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील वनी येथे सप्तशृंगीने सात डोंगररांगांच्या उंचभागावर शेती करून आपला गण जगवला होता.तुळजापूरही उंचावर आहे.तेथील तुळजा घाटाच्या खाली शेती करत असे.वस्ती मात्र घाटावर होती . आगदी त्याप्रमाणेच माहुर उंच डोंगरमाथ्यावर वसलेले सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीचे ठिकाण आहे.सौंदत्तीची राज्ञी रेणुका आपल्या गणासह माहुर भागात येवून टेरेस फार्मिंग म्हणजे डोंगरावरची टप्याटप्याची शेती करुन आपला गण वाढवत होती.माहुर हा उंच डोंगर आणि त्यावर सपाट भूभाग असलेले ठिकाण आहे.खाली जवळच पैनगंगा वहाते.ही पैनगंगा याच डोंगर रांगांना धडकुन पात्र वळवून पुढे निघून गेलेली आहे.हा भाग कितीही जलमय असला तरी वर लोकजीवन सुरळीतपणे चालेल अशी नैसर्गिक व्यवस्था माहुरची आहे. माहुर हा शब्द मा उर असा बनला आहे.माउर म्हणजे आईचे हृदय.जिने आपल्य...

ज्ञानाच्या अथांग सागरास क्रांतिकारी अभिवादन! 🌹🌹🙏

Image
"अदिम अवस्थेच्या टोळ्यांत फिरणाऱ्या स्वैर संभोगी द्विपाद पशूंच्या झुंडीपासूनचा अँथ्रोपॉलिजिकल स्टडी......    अॉस्ट्रिक, मेरेडियन, आर्यन्स, निग्रोलाईडस्, मंगोलियन द्रविडियन्स वांशिक समाजाचे लिनिएज...       सिंधू, मेसोपिटियन, मोसूए ते ग्रीक सभ्य नागर संस्कृत्या.... प्राचीन ते अर्वाचीन....      वंशसमाज ते चातुर्वर्ण्य वेद, उपनिषदे, पुराणे, ब्राह्मण्यके, आरण्यके, श्रुती स्मृती, संहिता.....  .      जातीचा आर्किमिडियन स्टँडपॉईंट  ते वर्गसमाज, प्रो. सेलिंग्मन, प्रो. मॅक्समुल्लर ते जॉन ड्युईच्या प्रॅग्मिटिजम पर्यंत...  अर्थशास्त्राच्या अथ पासून इति पर्यंत....    आधुनिक भांडवलदारी ते राज्य समाजवादापर्यंत......     पाण्याच्या मानवी मूलभूत हक्कांपासून ते माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचे संविधानिक अधिकारापर्यंत.. .  अशा सगळ्यांचं डायलेक्टिक्स आपल्या थ्री डायमेन्शियल चष्म्यातून बघणारा एक विद्वान मनुष्य......       या सगळ्यांच्या पसाऱ्यात मानवी दास्याचे गुलामीचे मूलभूत कारण शोधतोय...!!!  ...

कार्ल मार्क्स का मरत नाही?

Image
कार्ल मार्क्स का मरत नाही ? ●●●●●●●●●●●●●●●● आजच्या दिवशी कार्ल मार्क्स मेला.  जर्मनीत जन्मला अन अखेर लंडनच्या भूमीत दफन झाला. पण जो गाडला गेला तो मार्क्सचा देह होता, त्याने मांडलेला विचार मात्र अजरामर झाला. त्याचा विचार, त्याची विश्लेषण पद्धती, त्याने विकसित केलेले समाजशास्त्र जगभरच्या लोकांनी स्वीकारले. एक लक्षात असू द्या, समाजशास्त्र काही मार्क्सने जन्माला घातले नाही तर ते आधीच जन्माला आलेले होते. मार्क्सने केवळ त्यात महत्त्वाची भर घातली अन ते आणखी विकसित केले. आता यात  मार्क्सचे काय चुकले? का तो सत्ताधारी वर्गांच्या निशाण्यावर आला? जगभरचे शोषक वर्ग का त्याला गाडायला सज्ज झाले? काही विचारवंत असे असतात ज्यांना विरोधकांकडून प्रखर विरोध होतो. जंग जंग पछाडून त्यांना कायमचे मातीत गाडायचा प्रयत्न केला जातो.  पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा राखेतून झेप घेत राहतात. कार्ल मार्क्स असाच एक विचारवंत होता. खरं तर त्याला विचारवंत म्हणून स्थापित व्हायचं नव्हतं. या क्षेत्रात त्याला कोणतंही करियर करायचं नव्हतं, त्याला कुठलेही पुरस्कार मिळवायचे नव्हते की कुठे मिरवायचंही नव्हत...

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

Image
शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे.....?????  भारतीय जनमानसावर सर्वाधिक प्रभाव असणारा नायक....   शंकर, महादेव, आशुतोष, गंगाधर, केदारनाथ, पशुपतीनाथ, महारूद्र.....  मस्तमलंग, निरागस मनाचा निष्पाप भोलेनाथ ते कोपिष्ट तांडव करणारा आदी.....      तर या शंकराचा भारतीय जनमानसावर इतका आदीबंधात्मक जो प्रभाव आहे त्याला अध्यात्मिक अर्थाने पाहिलंय, त्यामुळे त्याच्या देहावरती हि अध्यात्मिक पुटं चढली ती खरवडून काढल्याशिवाय तात्कलिन समाजातले त्याचे क्रांतीकार्य समजणार नाही व त्याशिवाय समाजाच्या जाणीव-नेणीवेवर झालेला प्रभावही समजणार नाही....      .  शंकराला अशा रितीने समजून घेणेच मुळात अत्यंत साधंसोपं आहे. ते भौतिक आहे, पण तत्कालिन प्राचीन समाजात जे त्या कालानुरूप घडत असल्याने ते आज आपल्याला अतार्किक वाटते. त्या समाजातली अतार्किक कर्मकांडं, सामाजिक संकेत हे गुंतागुंतीचं वाटतात आणि अपरिहार्यपणे ते अमूर्ताकडे नेतात. हे अध्यात्मिक वाटतं. त्यात काळाच्या मोठ्या अशा पटात या गोष्टी घडल्या असल्याने त्या अधिकच गुंतागुंतीच्या वाटू शकतात पण त्या बहुप्रवाह...